मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन

जाहिरात /
Advertisement related to Marathi Dialect Survey

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन’ या संयुक्त प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी वरिष्ठ प्रकल्प समन्वयक-१, कनिष्ठ प्रकल्प समन्वयक-१, लिपिक-१,  शिपाई-१ ही पदे ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन-तत्त्वावर करार पद्धतीने भरली जाणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी २० प्रशिक्षणार्थींची ३ महिन्यांच्या कालावधीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी या जाहिरातीद्वारे पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
(अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ डिसेंबर २०१७)

पदांचा तपशील :

पदनाम: वरिष्ठ प्रकल्प समन्वयक, पदसंख्या - ०१ खुला संवर्ग

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची भाषाविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी व त्याचबरोबर भाषाविज्ञान विषयातील पी.एच.डी. पदवी किंवा भाषावैज्ञानिक क्षेत्रपाहणीचा व्यापक अनुभव; UGCप्रमाणित NET (भाषाविज्ञान); मराठी मातृभाषी; अमराठी उमेदवार असल्यास शालेय शिक्षण मराठीतून झालेले असावे; संगणकावर स्वतंत्रपणे मराठीत व इंग्रजीत काम करण्याची क्षमता.
अनुभव: भाषावैज्ञानिक सर्वेक्षणाचा / क्षेत्रपाहणीचा व्यापक अनुभव, भाषाशास्त्रीय विश्लेषणाचा अनुभव, भाषावैज्ञानिक दस्ताऐवजीकरणासाठी वापरात येणारी softwares (उदा. Toolbox, FLEX, ELAN, इ.) वापरण्याचा अनुभव.
वयोमर्यादा: वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कामाचे स्वरूप :- प्रकल्पप्रमुखाने वेळोवेळी नेमून दिलेली प्रकल्पविषयक कामे हाताळणे, प्रशिक्षण वर्गात सहभागी होणे, क्षेत्रपाहणी करणे, भाषिक नमुन्यांचे संपादन आणि विश्लेषण, आलेखनाच्या कामात सहभागी होणे;  प्रकल्पप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प साहाय्यकांच्या मदतीने प्रकल्पाचे काम पूर्ण करणे असे कामाचे स्वरूप राहील. वरिष्ठ समन्वयकाने प्रकल्पाशी निगडीत विषयावर प्रकल्पाच्या कालावधीत post-doctoral  अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
एकत्रित मासिक मानधन - रु. ४५,०००/-

पदनाम: कनिष्ठ प्रकल्प समन्वयक, पदसंख्या - ०१ खुला संवर्ग

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची भाषाविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी, UGCप्रमाणित NET (भाषाविज्ञान), मराठी मातृभाषी, अमराठी उमेदवार असल्यास शालेय शिक्षण मराठीतून झालेले असावे; संगणकावर स्वतंत्रपणे मराठीत व इंग्रजीत काम करण्याची क्षमता. भाषावैज्ञानिक क्षेत्रपाहणीचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
अनुभव: भाषावैज्ञानिक सर्वेक्षणाचा / क्षेत्रपाहणीचा अनुभव, भाषावैज्ञानिक विश्लेषणाचा अनुभव, भाषावैज्ञानिक दस्ताऐवजीकरणासाठी वापरात येणारी softwares (उदा. Toolbox, FLEX, ELAN, इ.) वापरण्याचा अनुभव.
वयोमर्यादा: वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कामाचे स्वरूप :- प्रकल्पप्रमुखाने वेळोवेळी नेमून दिलेली प्रकल्पविषयक कामे हाताळणे, प्रशिक्षण वर्गात सहभागी होणे, क्षेत्रपाहणी करणे, भाषिक नमुन्यांचे संपादन आणि विश्लेषण, आलेखनाच्या कामात सहभागी होणे;  प्रकल्पप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प साहाय्यकांच्या मदतीने प्रकल्पाचे काम पूर्ण करणे असे कामाचे स्वरूप राहील. कनिष्ठ समन्वयकाने प्रकल्पाशी निगडीत विषयावर प्रकल्पाच्या कालावधीत पी.एच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
एकत्रित मासिक मानधन - रु. ४०,०००/-

पदनाम: लिपिक, पदसंख्या - ०१ खुला संवर्ग

किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,  MS-CIT, इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान, संगणकावर युनिकोड वापराचे ज्ञान असावे,
अनुभव: लेखे ठेवणे, कॅशबुक, लेजर लिहिण्याचा अनुभव असावा; शैक्षणिक संस्थेत लिपिक या पदावर किमान एक वर्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा: वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे
एकत्रित मासिक मानधन  - रु.. १२,०००/-

पदनाम: शिपाई, पदसंख्या - ०१ खुला संवर्ग

किमान शैक्षणिक अर्हता : ८वी पास; दैनंदिन कार्यालयीन कामाचे ज्ञान.
अनुभव: शैक्षणिक संस्थेत शिपाई या पदावर किमान एक वर्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा: वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे
एकत्रित मासिक मानधन  - रु.. ८,०००/-

प्रशिक्षणार्थी : एकूण संख्या २०

‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ ह्या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे व प्रकल्पासाठी आवश्यक क्षेत्र-सेवक तयार करणे हा ह्या प्रशिक्षणाचा हेतू असेल. ह्या प्रशिक्षणांतर्गत तीन महिनांच्या कालावधीत भाषाशास्त्राचे प्राथमिक ज्ञान आणि क्षेत्रीय पाहणीच्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल.  
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची भाषाविज्ञान / मराठी / इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषा विषयातील पदवी (प्रथम वर्ग असल्यास प्राधान्य); विज्ञान / वाणिज्य शाखेतील किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण उमेदवार ज्यांना भाषाभ्यासात रस आहे असेही उमेदवार अर्ज करू शकतात;  मराठी मातृभाषी; अमराठी उमेदवार असल्यास शालेय शिक्षण मराठीतून झालेले असावे; संगणकावर स्वतंत्रपणे मराठीत व इंग्रजीत काम करण्याची क्षमता.
प्रशिक्षणासाठी  प्राप्त झालेल्या अर्जांतून २० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल.
अनुभव: क्षेत्रपाहणीचा, भाषिक विश्लेषणाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा: वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे
प्रशिक्षणार्थींचे दायित्व : - प्रकल्पासाठी ठरविलेले प्रशिक्षण विहित काळात पूर्ण करणे. प्रशिक्षणाच्या काळात प्रकल्पप्रमुखांच्या सूचनेनुसार प्रकल्पविषयक कामे हाताळणे.
प्रशिक्षणकाळातील एकत्रित मासिक विद्यावेतन - रु.. ६,०००/-
सदर प्रकल्पासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण करुन प्रशिक्षणाअंती घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींपैकी निवडक प्रशिक्षणार्थींना प्रकल्पात प्रकल्प-साहाय्यक म्हणून प्रकल्पाच्या पूर्ततेपर्यंत काम करण्याची संधी दिली जाईल. या पदांचे आरक्षण खालील प्रकारे असेल:
खुला संवर्ग ०४
अ.जा. ०१
अ.ज. ०१
वि.ज./भ.ज. ०१
इ.मा.व. ०१
प्रकल्प-साहाय्यक हे प्रकल्प प्रमुख आणि समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रपाहणी, भाषिक नमुन्यांचे विश्लेषण, आलेखन, इ. कामे करतील. प्रकल्प-साहाय्यकाचे एकत्रित मासिक मानधन: रु. १८,०००/-

अर्ज करण्याची कार्यपद्धती

 • अर्हताधारक उमेदवारांनी डेक्कन कॉलेजच्या https://www.dcpune.ac.in या संकेतस्थळावर सदर नियुक्तीसाठीच्या अटी व शर्ती वाचाव्यात व त्या मान्य असल्यास
  • संकेतस्थळावर (ह्या पानाच्या तळाशी दिलेला) अर्ज मराठीत (युनिकोड-आधारित) ऑनलाइन भरावा.
  • तसेच तिथे पीडीएफ स्वरूपात दिलेल्या नमुना अर्जाची मुद्राप्रत (printout) काढून तो अर्ज स्वहस्ताक्षरात भरावा.
उमेदवारांनी वरील प्रमाणे दोन्ही प्रकारे अर्ज भरणे अनिवार्य आहे.
 • या स्वहस्ताक्षरात भरलेल्या अर्जासोबत शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति, स्वत:चे पासपोर्ट आकाराचे (एक) छायाचित्र जोडावे.
 • आवेदनशुल्क म्हणून Registrar, Deccan College यांच्या नावे देय रु. १००/- (रु. शंभर फक्त)चा धनाकर्ष (DD) व अन्य आवश्यक कागदपत्रे यांसह अर्ज हातपोच / डाकपोच नोंदणीद्वारे (registered postद्वारे) पुढील पत्त्यावर पाठवावा: रजिस्ट्रार, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), येरवडा, पुणे ४११००६.
 • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ डिसेंबर २०१७ असून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्ज स्वीकारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या शेवटच्या दिवशी बंद पाकिटातील अर्ज सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विद्यापीठाच्या वर नमूद केलेल्या पत्त्यावरील कार्यालयात पोहोचेल अशा बेताने पाठवावेत.
 • शेवटच्या दिनांकानंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन' ह्या संयुक्त प्रकल्पासाठी वरिष्ठ समन्वयक, कनिष्ठ समन्वयक, प्रशिक्षणार्थी / प्रकल्प सहाय्यक, लिपिक आणि शिपाई, या करार पद्धतीने एकत्रित मानधन तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अटी व शर्ती.

अटी व शर्ती:

 1. उमेदवारांची मानधन तत्त्वावरील करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती ही डेक्कन कॉलेजच्या ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन' या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मर्यादित असेल.
 2. करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितांस विद्यापीठाच्या किंवा राज्य मराठी विकास संस्थेच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबतचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क राहणार नाही.
 3. निवड झाल्यानंतर कर्मचारी आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी सादर करणे आवश्यक राहील.
 4. नियुक्ती कालावधीत करार पद्धतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचारी यांची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र त्यांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाला सादर करणे आवश्यक असेल. सदर बंधपत्र करार पद्धतीने नियुक्ती देताना विद्यापीठाने विहित केलेल्या सर्व अटी मान्य असल्याबाबत, तसेच करार पद्धतीवरील उमेदवारांकडून नियमित सेवेत समावेशनाबाबत अथवा कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही याबाबत उल्लेख आवश्यक राहील.
 5. नियुक्ती प्रकल्प प्रमुख / कुलसचिव,  डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था  (अभिमत विद्यापीठ), पुणे यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार असतील.
 6. नियुक्ती झालेल्या अधिकारी/ कर्मचारी  यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना विद्यापीठाच्या  वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय असेल.
 7. करार पद्धतीवरील निवड झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी प्राप्त होणाऱ्या माहिती (data), कागदपत्रे, व आधारसामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे.
 8. करार पद्धतीने अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
 9. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या विचारात घेऊन चाळणी परीक्षा व मुलाखत किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.


कुलसचिव
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था
(अभिमत विद्यापीठ), पुणे ४११००६.


Sr. No. Name Details
1 Marathi Dialect Survey - Advertisement - Terms and Conditions Click here to view/download Advertisement - Terms and Conditions
2 Application Part-I : Online application form Click here to apply online
3 Application Part-II : Marathi Dialect Survey Hand-written Application form Click here to view/download application form

© 2020, Deccan College Post Graduate and Research Institute, Pune | Pageviews : Visitors Counter (from 1 March 2016)
Design and Developed by: Torna Informatics